धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीकृष्ण नगर मध्ये कलाविष्कार अकादमी द्वारा होशी छंदी गायक समुह मेलडी स्टार्स च्या वतीने स्व. मनोज कुमार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली व त्यानंतर मेलडी स्टार्स चे प्रवर्तक यांनी मनोज कुमार यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले त्यानंतर समन्यवक शरद वडगावकर, सह समन्वयक मल्हारी माने यांनी मनोगत व्यक्त केली . त्यानंतर मनोज कुमार यांच्या चित्रित गीतांचे गायन युवराज नळे , रविंद्र कुलकर्णी , शरद वडगाकर , पद्माकर कुलकर्णी , मल्हारी माने , धनंजय कुलकर्णी , मुकुंद पाटील , सुशील कुलकर्णी,दत्त प्रसाद जंगम ,सौ. वर्षा नळे ,सौ. सविता भोसले,सौ. सुनिता माने ,सौ. तारा मोरे यांनी गायन केले या प्रसंगी सौ.मैथिली कुलकर्णी कु. स्वरा कुलकर्णी उपस्थित होते सुत्रसंचलन रविंद्र कुलकर्णी यांनी केले तर पद्मा कर कुलकर्णी यांनी आभार मानले .