कळंब (प्रतिनिधी)- शहरातील प्रियदर्शनी अर्बन को-ऑप बँकेला ३१ मार्च २०२५ अखेर नफा हा १कोटी ४६ लाख रुपयाचा झालेला आहे.
सहकार क्षेत्रातील नामांकित बॅंक असलेल्या प्रियदर्शनी अर्बन को-आॅप बॅंक लि.कळंब हीची २०२४-२०२५ या सहकार वर्षात बॅंकेने उत्तुंग भरारी घेत ३१ मार्च २०२५ अखेर बॅंकेतील एकूण ठेवी १०४ कोटी ३५ लाख तर कर्ज वाटप ६० कोटी ९४ लाख झाले आहे.
बॅंकेचे एकूण खेळते भाग भांडवल ११८ कोटी ८६ लाख आहे.
बॅंकेने २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात एकूण व्यवसाय हा १६६ कोटी २९ झालेला आहे.बॅंकेला या वर्षात ढोबळ नफा १ कोटी ४६ लाख झालेला आहे.
बॅंकेचा नक्त NPA हा ०% (शून्य टक्के) सातत्याने राखलेला आहे.तसेच बॅंकेस भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून मंजूर करण्यात आलेल्या नवीन दोन शाखा केज जि.बीड आणि शिराढोण जि.धाराशिव या ग्राहकांच्या सेवेत लवकरच चालू करत आहोत. अशी माहिती
बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष श्रीधर (बाबा) भवर यांनी दिली आहे .
बँकेला एन.पी.ए प्रमाण ० % ठेवण्यात यश आले आहे. बँकेची मोबाईल बँकिग सेवा, गुगल पे, फोन पे, हि सेवा ग्राहकाच्या सेवेत चालु झाली आहे. बँकेची लॉकर आणि ए.टी.एम. हि सेवा कार्यरत आहे. बँकेने १०४ कोटी ठेविचे उद्दिष्ट पूर्ण करत आहे. बँकेला भारतीय रिज़र्व बँकेने गत वर्षी नविन दोन धाराशिव व बार्शी या शाखाना मंजुरी दिली होती . त्या शाखा ग्राह्कांच्या सेवेत कार्यरत झाल्या आहेत. आज बँकेचे कार्यक्षेत्र 5 जिल्ह्यामध्ये विस्तारलेले आहे.गतवर्षीचा बँकेस उत्कृष्ठ बँक पुरस्कार बँको तर्फे मिळाला आहे.बँकेच्या एकूण मुख्य कार्यालयासह ७ शाखा कार्यरत असून लवकरच नवीन 2 शाखा कार्यान्वित होत आहेत.बँकेने डिजिटल बँकिंग वरती भर देऊन ग्राहकांच्या सेवेत मोबाईल बँकिंग,UPI,IMPS सुविधा चालू केल्या आहेत व लवकरच ग्राहकांच्या सेवेत QR Code सुविधा सुरू करण्यात येईल.तसेच येणाऱ्या भविष्यकाळात नवनवीन तंत्रज्ञानाच्या सुविधा ग्राहकांना देण्याचा मानस संस्थापक अध्यक्ष श्रीधर भवर यांनी व्यक्त केला आहे.बँकेचे सभासद खातेदार ,ठेवीदार,कर्जदार,हितचिंतक यांच्या सहकार्याने बॅंकेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. अशी
ही माहिती बॅंकचे संस्थापक अध्यक्ष /चेअरमन श्रीधर भवर यांनी दिली आहे.