भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील वंजारवाडी येथील खोसरे वस्तीजवळ लाईट डी पी चे काम करणाऱ्या बालाजी भालचंद्र जगदाळे वय 35 वर्ष यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना शनिवार दिनांक 5 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

त्यास भूम येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. तेथून त्यास बार्शी येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी बालाजी यांचा मृतदेह थेट परांडा रोडवरील महावितरणच्या कार्यालयात मृतदेह ठेऊन ठिय्या मांडला. यावेळी पो.नी. प्रल्हाद सूर्यवंशी यांनी गावकरी व नातेवाईक यांची समजूत काढत जबाब नोंदवून घेतला. व त्यानंतर रात्री उशिरा मृतदेह वंजारवाडी येथे नेण्यात आला.  या प्रकरणाची भूम पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी उमेश देवकर हे पुढील तपास करत आहेत.


 
Top