तुळजापूर (प्रतिनिधी)- येथे उपविभागस्तरीय क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर येथे घेण्यात आले. यावेळी कृषी विज्ञान केंद्र मधील विषय तज्ञ श्रीकृष्ण झगडे यांनी खरीप हंगामा मधील पिकावरील एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले. तसेच कसबे म यांनी खरीप पूर्व मशागत तसेच खत व्यवस्थापन, पिकाच्या जाती, पेरणी नंतर ची कामे या विषयी मार्गदर्शन केले.
या नंतर उपविभागीय कृषि अधिकारी महादेव आसलकर यांनी कृषि विभागामार्फत खरीप हंगामा मध्ये राबवावयाच्या विविध मोहिमा/ उपक्रम अंतर्गत विविध कृषि तंत्र ज्ञानाची प्रत्यक्षिके दाखविणे, नवीन तंत्रज्ञानाच प्रसार करणे इत्यादी बाबी विषयी सखोल असे मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थितांचे चर्चा व शंका निरसण केले. या वेळी तालुका कृषि अधिकारी एस पी. जाधव, (धाराशिव), रितापुरे (उमरगा), महेश देवकाते (तुळजापूर,लोहारा), धाराशिव उपविभागातील सर्व मंडळ कृषी अधिकारी, कृषि पर्यवेक्षक कृषि सहाय्यक उपस्थित होते.