तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील माळुंब्रा येथील अठ्ठावीस वर्षिय युवक खाजगी सौर उर्जा विद्युत वहन पोलवर कामासाठी  चढला असता विजेचा शाँक लागुन मरण पावल्याची घटना शनिवार दि. 26 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता घडली.  या प्रकरणी खाजगी सौर उर्जा कंपनीने मयतास मदत करावी. या मागणीसाठी  माळुंब्रा ग्रामवासियांनी रविवार दि. 27 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता तुळजापूर सोलापूर महामार्ग रस्तावर रस्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनामुळे अर्धातास तुळजापूर सोलापूर महामार्ग रस्तावरील वाहतुक विस्कळीत झाली होती.

यावेळी महामार्गाचा दोन्ही बाजुस वाहनांची लांबचा लांब रांगा लागल्या होत्या.  यावेळी शिवसेना नेते अमोल जाधव, माळुंब्रा सरपंच गजानन वडणे यांच्या सह माळुब्रा ग्रामवासिय उपस्थितीत होते. तहसिलदार अरविंद बोळंगे, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, भाजप मंडल अध्यक्ष आनंद कंदले यांनी भेट देवुन आंदोलकांशी चर्चा केली. 

या आंदोलनातील वाहनातील प्रवाशांचे मोठे हाल झाले. यावेळी तामलवाडी पोस्टे पोलिसनिरक्षक गोकुळ ठाकुर सह त्यांचे सहकार्य बंदोबस्तासाठी उपस्थित होते.  कै उत्तम वडणे यांचा परिवारास सौरउर्जा कंपनीने अर्थिक मदत करावी अन्यथा सौर उर्जा प्रकल्प चालु न देण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला.

 
Top