तुळजापूर (प्रतिनिधी)-  तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात ड्रनेज लाईन वर टाकण्यात आलेले सिमेंट चेंबर सतत फुटुन त्यात भाविक नागरिक जखमी होत असल्याने आजपर्यत टाकण्यात आलेल्या चेंबर ची सखोल चौकशी करुन दोषी अंती संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी  होत आहे.

तिर्थक्षेञ तुळजापूरात तुळजापूर विकास प्राधिकरणांतर्गत करण्यात आलेले काम प्रारंभी पासुन संशियाचा भोव-यात वादात सापडले आहे. सध्या भाविक प्रचंड संखेने येत असुन त्यातच घाटशीळ रोड 108 धर्मशाळे समोरील चेंबर फुटुन त्यात भाविक पडुन जखमी झाल्याचे सांगितले जाते. या निषेधार्थ तिथे उपस्थितीत असणाऱ्या तरुणांनी त्या खड्यात वृक्षारोपणकरून नगरपालिकेचा जाहीर निषेध केला. 

यात प्रामुख्याने ज्याचा साठी तुळजापूर विकास प्राधिकरण करुन तीनशे कोटी खर्च केले त्या खर्च केलेल्या खड्यात पडून भाविक जखमी होत असेल तर हा खर्च कुणासाठी केला असा प्रश्न निर्माण होत आहे. अजून किती दिवस नगरपालिका भाविक भक्तांच्या जीवाशी खेळणार आहे असा सवाल करीत असुन वाढत्या भाविकांची गर्दी पाहून तरी मुख्य अधिकारी अशा समस्यांकडे लक्ष देवुन यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

 
Top