धाराशिव (प्रतिनिधी)-  जगन्नाथ पुरी ओडिसा याठिकाणी झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय खो -खो स्पर्धेत श्रीपतराव भोसले माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, धाराशिव मध्ये कला शाखेत इयत्ता बारावी मध्ये शिकणारी तन्वी युवराज भोसले हिला भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून दिला जाणारा “राणी लक्ष्मीबाई “ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या पुरस्काराबद्दल सर्व प्रशिक्षक प्रवीण बागल, अभिजित पाटील, विवेक कापसे यांचे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्राध्यापक डॉ. चंद्रजीत जाधव, संस्थेच्या सरचिटणीस प्रेमाताई सुधीर पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य  पाटील, प्राचार्य  एन.आर.नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम व पर्यवेक्षक यशवंत इंगळे, श्रीमती बी.बी. गुंड, सुनील कोरडे, राजेंद्र जाधव, निखिलकुमार गोरे, धनंजय देशमुख, प्रा. मोहन शिंदे, प्रा. विनोद आंबेवाडीकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 
Top