धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील भूमिपुत्र सध्या न्यू कॉलेज कोल्हापूर येथे कार्यरत असलेले वनस्पती शास्त्राचे गाढे अभ्यासक प्रा.डॉ.विनोद भिमराव शिंपले यांची इंग्लंड येथील आंतरराष्ट्रीय वनस्पती वर्गीकरण कमिशनच्या सदस्यपदी निवड झाली आहे.
सदर कमिटीत जगभरातील विविध संशोधकाकडून संशोधन प्रकल्प मागवते व त्यांना अनुदान प्रदान करते. या संशोधन प्रकल्पाच्या चाळणी व मंजुरी करणाऱ्या कमिटीवरती जगभरातून 33 सदस्यांची निवड केली जाते. त्यापैकी भारतातून तीन संशोधकांची निवड केली गेली आहे. यामध्ये प्रा. डॉ. विनोद शिंपले यांची सदरची निवड ही सन 2025 ते 2028 या तीन वर्षासाठी असणार आहे. या निवडीबद्दल प्राध्यापक शिंपले यांचे महाविद्यालयाच्या सर्व घटकातर्फे व कसबे तडवळे येथील सर्व नागरिकांतून अभिनंदन होत आहे.