धाराशिव (प्रतिनिधी)- तेर येथील कुंभार समाजाचे दैवत श्री संत शिरोमणी गोरोबाकाका मंदिराच्या प्रस्तावित महाद्वाराचे महाराष्ट्र शासनाच्या वतीने वास्तूशास्त्राचा आधार न घेता चुकीच्या दिशेला काम चालू असल्याने त्यास महाराष्ट्र कुंभार समाजाच्या वतीने याला विरोध करून पुर्वेलाच संत गोरोबा काका मंदिरांचे महाद्वार व्हावे म्हणून तसेच कुंभार समाजाच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने कुंभार समाजाचे स्थानिक नेते महादेव खटावकर यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले असताना दिनांक 4 एप्रिल 2025 कुंभार समाजाचे प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा करून उपोषण सोडले.
तसेच या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी पांडुरंग कुंभार यांच्या माध्यमातून चर्चा केली असतां मी येत्या सोमवारी सर्व संबंधितांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासीत जिल्हाधिकारी यांनी केले असल्याने तसेच कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, धाराशिव यांनी संत गोरोबा काका व शिव मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्वेला करू असे लेखी पत्र दिले असल्याने महादेव खटावकर यांनी विशेष करून उपस्थित असलेले आमदार कैलास पाटील, सतीश दरेकर, प्रदेश अध्यक्ष रमाकांत भाऊ क्षिरसागर यांच्या हस्ते नारळ पाणी पिऊन आपले आमरण उपोषण सोडले. व उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी वसंत घोडनदीकर, पांडुरंग कुंभार, अनंत कुंभार, सोमनाथ सोनवणे, राजाभाऊ बोरुडे, प्रकाश भालेराव, बाळासाहेब कुंभार, अण्णा राहुकर, अशोक जाधव, भरत शिरसाठ, वसंत कुंभार, सुरेश रसाळ, लिंबाजी कुंभार इत्यादी उपस्थित होते. तसेच यासंदर्भात महादेव खटावकर यांच्या समवेत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.