भूम (प्रतिनिधी) - येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये मा .मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव मा . मैनाक घोष यांच्या संकल्पनेतून 24×7 गेम्स फाउंडेशन तर्फे CSR फंडातंर्गत सायकल बँक योजनेतून 10 विद्यार्थिनींना मा .गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते सायकलचे वाटप करण्यात आले .यामध्ये समृद्धी चव्हाण, सानिका गिरी, धनश्री चोरमले, मुक्ता पाटोळे, राऊत सिद्धी, अनुष्का पाटोळे, भगत गीता, गायकवाड भक्ती ,शिंदे प्रणाली ,पूनम बनसोडे या विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले .प्रशालेतील शिक्षण संपल्यानंतर या सायकली इतर विद्यार्थिनींना देण्यात येणार आहेत म्हणजेच गरजू विद्यार्थिनींना या सायकल बँकेचा फायदा होणार आहे .
या कार्यक्रमाला मुख्याध्यापक तात्या कांबळे ,पवार के सी ,पाटील डी जी , पायघन यु पी , जोशी ए टी , गुंजाळ डी एस , विभाग प्रमूख श्रीमती विधाते व्ही आर ,सुनील जाधवर, साठे एच डी ,झरकर अनंता व विद्यार्थी व पालक उपस्थित होते .