उमरगा (प्रतिनिधी)- येथील जुनी पेठ येथे नव्याने बांधण्यात आलेल्या मृत्युन्जय हनुमान मंदिराचे  वास्तू पूजन, लोकार्पण व कलशरोहण कार्यक्रमची सुरवात  कलश मिरवणूकीने करण्यात आली.

यावेळी परिसरातील लेकींना आमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी सुवासिनी महिलानी डोक्यावर सजविलेला कलश घेऊन शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. युवक मंडळी सुद्धा होती.यावेळी मोठी गर्दी झाली होती. योग्य नियोजन व युवकांच्या पुढाकाराने सोहळा व्यवस्थित पार पडला. दरम्यान या निमित्त चार दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.भजन, कीर्तन चा कार्यक्रम आहे.

चार दिवस अन्न दात्त्याच्या सहकार्याने महाप्रसाद चे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. मंदिर व कळस उत्तम बांधण्यात आले असून, सुंदर रंगरगोटी करून भिंतीवर सुंदर चित्रे काढण्यात आली आहेत. मंदिर सभागृह करिता तत्कालीन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी 15 लाख रुपये निधी दिला आहे तर सार्वजनिक पट्टी करून मंदिर बांधकाम व कळस बांधण्यात आला आहे.हनुमान भक्तांनी मोठया प्रमाणात देणगी व पट्टी दिल्याने हे कार्य उत्तम झालं आहे.शिवसेना युवानेते किरण गायकवाड, जेष्ठ नेते जितेंद्र शिंदे, शाहू कदेरे यांनी सुद्धा भरीव देणगी दिली आहे. याकरिता आनंद दुबे, शाहूराज कदेरे, नितीश ठाकूर, सोम घोडके,अभिषेक औरादे,राजू दूधभाते, धनु हेबळे, पृथ्वीराज दुबे,अशोक बनसोडे,राजू औरादे, श्रीकांत पतगे, दिगंबर औरादे, बाळू माळी, जितू दुबे, यशवंत मुळे, प्रशांत औरादे, शरद कदेरे, खंडू औरादे, खंडेराव कदेरे,किरण वळसंग, रतन घोडके, राजू दुबे, परमेश्वर बनसोडे,गोविंद दूधभाते, धीरज पतगे, अमर बिराजदार, विष्णू बिराजदार, उज्वल कदेरे, शिवलिंग स्वामी, गौरव लोकरे, रवी शेटगार, हर्ष कदेरे,अर्जुन औरादे, धोंडू सुरवसे यांनी कठोर परिश्रम घेतले.

 
Top