उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद हायस्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बालाजी नगरच्या वतीने गुढीपाडवा प्रवेश वाढवा उपक्रम अंतर्गत पहिली सीबीएसई मध्ये प्रवेशीत झालेल्या विद्यार्थी व पालकांच्या सत्कार व ज्ञानप्रबोधिनी हराळी संस्थेकडून जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा येथे फेरो सिमेंट या नवीन पद्धतीने तयार करण्यात आलेल्या 15000 लिटर पाण्याच्या हौदाचा लोकार्पण सोहळा यावेळी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी आमदार प्रवीण स्वामी बोलत होते. यावेळी शालेय समिती अध्यक्षा शकुंतला मोरे अध्यक्षस्थानी होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा अँड.आकांक्षा चौगुले, शिवाई किरण गायकवाड, निसर्ग प्रेमी ग्रुपच्या डॉ. ज्योती सातपुते, ज्ञानप्रबोधिनी हराळीच्या शाळाप्रमुख डॉ मधुरा काशीकर,उमरगा केंद्राच्या केंद्रप्रमुख शिला मुदगडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा वरवटे मॅडम मुख्याध्यापक पद्माकर मोरे उमरगा तालुका महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष विजय ओवांडकर सरचिटणीस आर.टी. सुर्यवंशी ज्ञानेश्वर सांगवे, संदीप चौगुले, सचिन सूर्यवंशी, उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत पहिली वर्गासाठी प्रवेश पात्र असलेल्या 25 विद्यार्थ्यांचा आमदार प्रवीण स्वामी व सर्व पाहुण्यांच्या हस्ते साखरेचा हार व गुलाब देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी झांज पथकासह शाळेची प्रभात फेरी काढून काळे प्लॉट, हमीदनगर ,कुलकर्णी प्लॉट, एस टी कॉलनी, या भागात जनजागृती करण्यात आली. त्यानंतर सर्व पालकास विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेऊन फुग्याने सजवलेल्या पहिली सीबीएसईच्या वर्गात पालकांना वर्ग व अभ्यासक्रमाची माहिती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात अँड आकांक्षा चौगुले शिवाई किरण गायकवाड केंद्रप्रमुख शिला मुदगडे, डॉ, ज्योती सातपुते,डॉ,मधुरा काशीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पद्माकर मोरे सूत्रसंचालन सरिता उपासे तर आभार शिल्पा चंदनशिवे यांनी मांनले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यानंद सुत्रावे बशीर शेख धनराज तेलंग सदानंद कुंभार संजय रूपाजी धोंडीराम एरंडे सोनाली मुसळे ममता गायकवाड धनराज गाडेकर नागसेन बनसोडे राजू सरपे वैशाली चिट्टे, सुवर्णा इंगळे सुरेखा मुलगे महानंदा कारागीर यांनी परिश्रम घेतले.