भूम (प्रतिनिधी)- माजी मंत्री प्रा. तानाजी सावंत यांचे कट्टर समर्थक असणारे भूमचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली व त्यांचा यथोचित सन्मान केला.
यावेळी मंत्री महोदयांसोबत विविध विकास कामांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी युवासेना राज्य विस्तारक नितीन लांडगे, कळंब नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा, मुरुड येथील अभिजित मुंदडा, पंचायत समितीचे माजी उपसभापती रामकिसन गव्हाणे, जांब चे सरपंच समाधान भोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.