कळंब (प्रतिनिधी)- होळकर चौकात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा, शिल्प उभारण्या संदर्भात सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना निवेदन देवून मागणी करण्यात आली आहे.
येथील होळकर चौकात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा/शिल्प उभारावा अशी सकल धनगर समाज बांधवांची व बहुजनांची खूप दिवसापासूनची मागणी आहे. हे वर्ष राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे 300 वी जयंती वर्षे म्हणून संपूर्ण देशात व आपल्या राज्यात साजरे केले जात असून विविध उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून येथील होळकर चौकात आमदार फंडातून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा / शिल्प उभारले जावा अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. सदरील पुतळा/शिल्प हे येत्या 31 मे 2025 म्हणजेच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती पुर्वी पूर्ण व्हावे अशी विनंती करण्यात आली आणि
लागलीच त्याला दोन्ही महोदयांनी सहमती दर्शविली. यावेळी डॉ. रामकृष्ण लोंढे, संतोष घाटूळे, अशोक शिंपले, नानासाहेब लोकरे, अभिमन्यू लिके, संभाजी हारकर, सुनील लिके पाटील, अशोक शिंपले आदी उपस्थित होते.