भूम (प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीच्या नूतन भूम तालुका मंडल अध्यक्षपदी संतोष सुपेकर तर भूम शहर मंडलाध्यक्षपदी बाबासाहेब वीर यांची पक्षश्रेष्ठीकडून निवड झाली . त्यांचे तालुका भाजपच्यावतीने स्वागत करुन पेढे वाटून फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.
रविवार दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी तालुका भाजप कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा निवडणूक निरीक्षक गुरुनाथ मगे यांच्या मार्गदर्शनाखाली भूम तालुका मंडल अध्यक्षपदी संतोष सुपेकर तर भूम शहर मंडल अध्यक्षपदी बाबासाहेब वीर यांची निवड जाहीर केली . ही सर्व निवड प्रक्रिया परंडा विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या देखरेखी खाली पार पडली .
यावेळी परंडा विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष निवड ही पक्षाच्या ध्येय धोरणानुसार झालेली असून पूर्ण वेळ कार्यकर्ते पक्षाला मिळालेले आहेत .याचा उपयोग आगामी प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्षाचा टीआरपी वाढवण्यासाठी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला .
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील, मावळते तालुका अध्यक्ष महादेव वडेकर , अनुसूचित जाती जमाती तालुका अध्यक्ष प्रदीप साठे, तालुका प्रसिद्धीप्रमुख शंकर खामकर , उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष चंद्रकांत गवळी, अध्यात्मिक आघाडी तालुका अध्यक्ष योगेश आसलकर , युवा नेते आबासाहेब मस्कर, बन्सी महाराज काळे , कामगार मोर्चा मराठवाडा प्रदेश सदस्य सचिन बारगजे, बापू बगाडे, मुकुंद वाघमारे शांतीराज बोराडे, शुभम खामकर , जोतीराम पावले ईराचीवाडी, हनुमंत शेलार आष्टा, ज्ञानेश्वर गिलबिले, विभीषण पवार वालवड, सुबराव शिंदे वाल्हा, ज्ञानेश्वर सानप उळूप , अंकुश करडे बऱ्हाणपूर, अलिभाई निमटके अलीभाई इद्रूस माणकेश्वर, सुहास सानप , सुरेश उपरे, युवा तालुका अध्यक्ष गणेश भोगिल, पिंटू भारती आदींची उपस्थिती होती.