कळंब (प्रतिनिधी)- येथील बस स्थानकात वाढती गर्दीची संख्या लक्षात घेऊन कळंब आगाराचे आगार प्रमुख एस. डी. खताळ यांनी सुट्टीच्या दिवशीही आरक्षण केंद्र सुरू ठेवल्याने प्रवाशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .

राज्य परिवहन महामंडळाच्या प्रत्येक बस डेपोत एक स्वतंत्र आरक्षण सुविधा केंद्र उभा करण्यात आले आहे. हे केंद्र सुट्टीच्या दिवशी हमखास बंद असते. याचा फायदा बाहेरील खाजगी आरक्षण केंद्रा वाले घेऊन प्रवाशांची अमाप लूट करतात. त्यामुळे कळंबच्या आगार प्रमुख खताळ यांनी या बारीक गोष्टीवर लक्ष ठेवून कळंब येथील सुट्टीच्या दिवशी बंद असलेले आरक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशातून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. कळंब आगारात आरक्षण केंद्रात दररोज जवळपास 70 ते 80 हजार रुपयांचे कलेक्शन गोळा होते. सध्या गर्दीचा हंगाम लग्नसराई व सुट्ट्या सुरू झाल्यामुळे बस स्थानकावर दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. त्यातच बसची संख्या कमी असल्याने प्रवाशांनी आरक्षण करून प्रवास करणे प्रथम पसंती दर्शवली आहे. त्यासाठी प्रवासी आरक्षण केंद्रावर आरक्षण करण्यासाठी सकाळपासूनच रांगा लावून असतात. पण सणवार किंवा सुट्टी आल्याने हे आरक्षण केंद्र बंद राहते. याचा फायदा शहरातील काही खाजगी केंद्र घेत असल्यामुळे व प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्यामुळे येथील आगारप्रमुखांनी हे आरक्षण केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांनी सुट्टी दिवशीही कळंब स्थानकावर आरक्षण सुविधा केंद्र चालू राहील असेही आवाहन आगार प्रमुख एस. डी. खताळ यांनी केले आहे. या आरक्षण केंद्रासाठी वाहतूक नियंत्रक हनुमंत मुंडे, वाहक महेश थोरबोले, वाहतूक नियंत्रक चेतन गोसावी, वाहतूक निरीक्षक निलेश जाधव, सहाय्यक वाहतूक निरीक्षक अभिजीत धाकतोडे, सहाय्य कार्यशाळा अधीक्षक बालाजी भारती, आगार लेखआकार लखन कांबळे, आरक्षण विभाग प्रमुख सुशील हुंबे हे परिश्रम घेत आहेत.

 
Top