कळंब (प्रतिनिधी)- येथील शिक्षण महर्षी  ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयामध्ये दि. 27 एप्रिल 2025 रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, शिक्षक व प्राध्यापकांची एक दिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

या दिवसभर चाललेल्या उद्बोधन शिबिराचे उद्घाटन  तृप्ती अंधारे शिक्षणाधिकारी नियोजन जिल्हा परिषद लातूर  यांच्या  हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी शिक्षक व प्राध्यापकांना सांगितलं शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची उपस्थिती कशी राहील व विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढवता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. आबासाहेब बारकुल उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांनी केली. 

दुसऱ्या सत्रात अधिव्याख्याता सुचित्रा जाधव अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव, यांनी  2020 च्या अनुषंगाने एन.सी.एफ. व एस.सी. एफ. यावर मार्गदर्शन केले. 

तिसऱ्या सत्रात संस्थेतील तज्ञशिक्षक धनंजय डोळस यांनी नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षकांची भूमिका, सोपान पवार यांनी 21 व्या शतकातील कौशल्य व भविष्यवेधी शिक्षण, डॉ. माधव गोरे यांनी नवीन शैक्षणिक धोरण 2020 दिव्यांग विद्यार्थी संबंधी विशेष तरतुदी याविषयी  मार्गदर्शन केले.

समारोप सत्रातील कार्यशाळेसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धाराशिवचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे व  लातूर विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले. यावेळी  डॉ. गणपतराव मोरे  यांनी विनोदी आणि खुमासदार वक्तृत्व शैलीतून उपस्थित शिक्षक, प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरण देशासाठी दिशादर्शक आहे. तसेच त्यांना शिक्षक व प्राध्यापक यांना त्यांच्या कामाची जाणीव देखील करून दिली. 

याप्रसंगी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, उपाध्यक्ष आबासाहेब बारकुल, संस्थेचे संचालक डॉ. डी. एस. जाधव, प्रा. संजय कांबळे, वसंत मडके, महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ.हेमंत भगवान , संचालिका अंजलीताई मोहेकर, अलकाताई मोहेकर ,कळंब पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी फुलारी साहेब,मुख्याध्यापक शिवाजी पौळ, संजय जगताप, अजित साळवे, दिगंबर खामकर, व्यंकट कुंभार, सुभाष लाटे, सुनील पांचाळ, नागनाथ सूर्यवंशी, लातूर बोर्डाचे संचालक प्रा. सुशील शेळके, उपप्राचार्य प्रा.अप्पासाहेब मिटकरी, उपमुख्याध्यापक विक्रम मायाचारी, पर्यवेक्षक श्रीमती जगदेवी कोळी, गंगाधर डबे, श्रीनिवास पांचाळ यांच्यासह ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेतील विविध शाळा, कॉलेजमधील 250 शिक्षक, प्राध्यापकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक संभाजी गिड्डे, आनंद रामटेके, प्रा.नवनाथ करंजकर, प्रा. जे.एच. काझी यांनी केले तर आभार प्रा. अरविंद शिंदे  यांनी मानले.

 
Top