भूम (प्रतिनिधी)- इराचीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले असून शाळेतील तीन विद्यार्थी पात्र झाले आहेत.
यामध्ये प्रणवी विशाल तोरकड ,श्रेयश विजय रांजवण ,तनिष्का ज्ञानोबा देवरे यांनी या संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक विनोद कांबळे यांनी मार्गदर्शन करून नियमित सराव परीक्षा घेऊन अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी शब्दकोश व पेन दिले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील ही तीन मुले यशस्वी झाली आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापिका श्रीमती रेखा खराडे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सारिका तोरकड गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी, शिक्षण विस्तारअधिकारी अनिता सुलतानपुरे शिक्षक व पालक पालक यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाला शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.