तुळजापूर (प्रतिनिधी)- गंधोरा येथे  रिन्यु कंपनी कडे जमिनीचा मोबदला मागण्यासाठी गेलेल्या सोनटक्के कुंटुंबाला तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी    वरिष्ठ अधिका-यांचा सांगण्या वरुन शिवीगाळ करुन  यात ऐका महिलेला अर्धनग्न करुन मारहाण केल्या प्रकरणी सहा जणांविरोधात नळदुर्ग पोलिस स्टेशन शनिवार दि. २६ एप्रिल रोजी गुन्हा  दाखल झाला आहे. 

दरील घटना बुधवार दि  २३ ऐप्रिल रोजी  सकाळी ११ वा. घडली. या प्रकरणी , सुनिता दिगंबर सोनटक्के,  शेती रा. गंधोरा ता. तुळजापुर  यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे कि, आमची शेती गंधोरा शिवारात असून त्यावर कुंटुंबाची गुजरान होते  आमचे शेताशेजारी रिन्यू पवनचक्की प्रकल्पाचे सब स्टेशन उभे केलेले आहे. सबस्टेशन येथे जाण्यासाठी रस्ता नव्हता त्यावेळी रिन्यू कंपनीची वाहने आमच्या शेतातून तीन  ते चार महीने ये-जा केली होती. त्याचा मोबदला रिन्यू कंपनीकडे बाकी होता. माझा मोठा मुलगा पांडूरंग हा सदर मोबदला मागण्यासाठी कंपनीचे रमेश, गंगाधर, रावसाहेब शिंदे , यांचेकडे मागील सात  महीन्यांपासून पाठपुरावा करत आहे. परंतु, कंपनीचे लोक मला उडवा उडवीची उत्तरे देऊन माझा मोबदला देण्यास टाळाटाळ करत आहेत.  दि. 23/04/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता मी, माझे पती दिगंबर सोनटक्के, माझा मोठा मुलगा पांडूरंग असे आम्ही आमच्या जमीनीतून गेलेल्या वाहनाचा मोबदला मागण्यासाठी आमचे शेताचे जवळील रिन्यू कंपनीच्या सबस्टेशन येथे गेलो होतो. त्याठिकाणी जाऊन माझा मुलगा पांडूरंग याने तेथील सेक्यूरीटीवरील एकाला म्हणाला की, मला रमेश, गंगाधर व रावसाहेब शिंदे यांना भेटायचे आहे. त्यावेळी तेथील सेक्यूरीटीवाला म्हणाला की, मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून घेतो. तुम्ही तोपर्यंत थांबा असे म्हणाल्याने आम्ही त्याठिकाणी थांबलेलो होतो. त्यानंतर माझी दोन्ही लहान मुले महादेव व सहदेव हे पण त्याठिकाणी आले. थोड्या वेळाने एम.एस.एफ. सेक्यूरीटीमधील आठ ते ते नऊ  जण वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सांगण्यावरून त्याठिकाणी आले व त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांनी आम्हाला काही न बोलता धक्काबुक्की करून मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी दोन सेक्यूरीटीने माझे हात धरून ठेवले व त्यांनी मला खाली पाडले. त्यावेळी सेक्यूरीटीपैकी तीन जण आमची भांडण सोडवीत होते व बाकीचे सेक्यूरीटीवाले आम्हाला मारहाण करत होते. त्यावेळी त्यांनी माझी साडी सोडून मला अर्धनग्न करून मला मारहाण केली व माझ्या छातीला हात लावून माझ्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. त्यावेळी सेक्यूरीटी मध्ये असलेली शितल देवकर हीने माझा डाव्या हाताला धरून माझे बोटे पिरगळवीली. त्यावेळी माझा मुलगा पांडूरंग जीव वाचवून त्यांच्या तावडीतून पळून जात होता परंतू त्यांनी त्याच्या मागे पळून त्याला सुद्धा मारहाण केली. त्याचवेळी माझे पती यांच्या डोक्यात रोडने मारून त्यांना मुका मार दिला. त्याचदरम्यान कोणीतरी पोलीसांना फोन करून बोलावून घेतले. पोलीस त्याठिकाणी आल्यानंतर आमचे त्यांनी आमचे भांडण सोडवले या प्रकरणी सहा जणांन विरोधात नळदुर्ग पोलिस ठाण्यात भारतीयन्यायसंहिता 2023अन्वय 74,118(1),115(2),189(2),191(2)190 अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 
Top