भूम (प्रतिनिधी)- भूम कुंथलगिरी रोडवर दि. 19 एप्रिल रोजी दुपारी 1 च्या दरम्यान शुकूर बागवान यांच्या शेतातील गोडाऊनला अचानक आग लागल्याने गोडाऊन मधील साहित्य जळून खाक झाले. भूम नगरपरिषदेची अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी आल्यानंतर आग विजवण्यात आली. महावितरणचे अधिकारी व स्टाफ येऊन घटनास्थळाकडील सप्लाय बंद करण्यात आला. परंतु आग कशामुळे लागली हे अद्याप सष्ट होऊ शकले नाही. 

अधिक माहिती अशी की बागवान यांचे कुंथलगिरी रोडला साहित्याचे गोडाऊन होते. त्या गोडाऊन मधील फ्रुट साठी वापरण्यात येणारे कॅरेट, ट्रॅक्टरचे टायर्स व इतर साहित्य असे मिळून अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे बागवान यांनी सांगितले. आग इतरत्र पसरू नये म्हणून नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाडीने आजूबाजूला शेताच्या बांधावर पसरलेली आग विझवण्यात आली. या अचानक लागलेल्या आगीमुळे मात्र व्यापाऱ्याचे नुकसान झाले आहे. या घटनास्थळी पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट दिली.


या गोडाऊनच्या जवळच सोपान वरवडे यांचा गाय म्हशींचा गोठा आहे. तेथील जनावरे काही धाडसी युवकांनी आगीची पर्वा न करता सुरक्षित ठिकाणी हलवली. त्यामुळे जनावरांना देखील कोणतेही क्षती पोहोचली नाही.

 
Top