धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र पोलीस प्राधिकरणाच्या मदतीने गेल्या 8 वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यातील 6200 प्रकरणांचा निपटारा केला. पीडित लोकांसाठी काम केल्याचा आनंद आपल्याला होतोय अशी माहिती महाराष्ट्र पोलीस प्राधिकरण न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर यांनी मिट द प्रेस कार्यक्रमातून दिली. धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पोलीस प्राधिकरणा संदर्भात बोलताना मिटकर म्हणाले, 2006 मध्ये न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यामध्ये पोलीस प्राधिकरण स्थापन करण्यात आले या माध्यमातून पीडित लोकांना न्याय देण्याचं काम अविरत सुरू आहे. भटक्या समूहातील जमाती करिता मिटकर यांनी स्वत:ला वाहून घेतले होते. पालावरची शाळा हा त्या उपक्रमाचा एक भाग होता. भटक्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी,त्यांच्या उदार निर्वाह करिता, केलेले प्रयत्न आणि संघर्षमय भूतकाळाला मिटकरी यांनी उजाळा दिला, गेल्या 23 वर्षा मध्ये केवळ निस्वार्थी वृत्तीने,पीडित लोकांसाठी केलेल्या कामाचा जीवनपट उमाकांत मिटकर यांनी माध्यम प्रतिनिधी समोर मांडला.पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तक्रारींचा महाराष्ट्र पोलीस प्राधिकरण मध्ये चौकशी, पडताळणी नंतर न्यायिक आदेश देण्याचे काम होते. असे ते म्हणाले.  मीट द प्रेस कार्यक्रमाची संकल्पना आणि भूमिका अध्यक्ष देवदास पाठक यांनी विशद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र केसकर तर आभार गोविंदसिंह राजपूत यांनी मानले.


 
Top