उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे-तेजस राकेश शिंदे, रा. चैतन्यब्रम्ह अपार्टमेंट चिपळुण जि. रत्नागिरी, अजय देवकर रा. साक्शाल पिंपरी ता. गेवराई जि. बीड यांनी दि.12.06.2024 रोजी 10.00 वा. सु. ते दि.25.06.2024 रोजी व्हंताळ येथे मोबाईल फोनवरुन फिर्यादी नामे-संदिप माधव मगर, वय 25 वर्षे, रा. व्हंताळ ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तुला ऑईल टँकर शिप वर काम लावतो व तुझे ट्रेनिंग झाले आहे असे सर्टिफिकेट काढून देतो त्यासाठी एजंटला दोन लाख रुपये दयावे लागतील असे सांगून फिर्यादीकडून 1,99,000 घेवून नोकरी न लावता फिर्यादीची फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संदिप मगर यांनी दि.10.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.दं.वि.सं.कलम 420, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.