धाराशिव (प्रतिनिधी)- श्री येडेश्वरी देवी चैत्री पौर्णिमा यात्रा दिनांक 09/04/2025 ते दिनांक 18/04/2025 पावेतो साजरी होणार आहे. सदर चैत्री पौर्णिमा कालावधीत मौजे येरमाळा ता. कळंब मध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. तसेच दिनांक 12/04/2025 व दिनांक 13/04/2025 या कालवधीत, पालखी मिरवणुक, चुनखडी वेचणे व पौर्णिमा निमित्त महाराष्ट्रासह इतर राज्यातुन लोखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येरमाळा या गावी येतात. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची वाहतुक चालु असते व सदरचा रस्ता हा वर्दळीचा असल्याने या दरम्यान वाहनांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

त्याअर्थी आम्ही किर्ती किरण पुजार (भा.प्र.से.) जिल्हादंडाधिकारी, धाराशिव व संजय जाधव (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, धाराशिव यांना प्राप्त असलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (ब) अन्वये अधिकारा नुसार खालील प्रमाणे वाहतुक मध्ये बदल करुन दिनांक 11/04/2025 रोजीचे 00:01 ते दिनांक 13/04/2025 रोजीचे 24:00 वाजे पर्यंत सर्व प्रकारचे जड वाहनांची वाहतुक बंद ठेवण्याचे आदेश निर्गमीत करण्यात येत आहे.

अवलंब करावा.

पुर्वीचा जड वाहतुक मार्ग

छत्रपती संभाजीनगर ते येरमाळा मार्गे बार्शी कडे जाणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास येरमाळा कुसळंब  बार्शी या दरम्यान मनाई करण्यात येत आहे.

बार्शी ते येरमाळा मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे येणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास बार्शी कुसळंब  येरमाळा या दरम्यान मनाई करण्यात येत आहे.

कळंब ते येरमाळा मार्गे बार्शी कडे जाणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास येरमाळा कुसळंब बार्शी या दरम्यान मनाई करण्यात येत आहे.

बार्शी ते येरमाळा मार्गे कळंब कडे येणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास बार्शी कुसळंब येरमाळा या दरम्यान मनाई करण्यात येत आहे.

 बार्शी ते येरमाळा मार्गे परळी, परभणी कडे येणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास बार्शीकुसळंब येरमाळा या दरम्यान मनाई करण्यात येत आहे.

परभणी, परळी ते येरमाळा मार्गे बार्शी कडे जाणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास येरमाळा कुसळंब  बार्शी या दरम्यान मनाई करण्यात येत आहे.

 कळंब ते येरमाळा, मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जाणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास येरमाळा  छत्रपती संभाजीनगर या दरम्यान मानई करण्यात येत आहे.

 छत्रपती संभाजीनगर ते येरमाळा, कळंब कडे येणारी वाहतुकीस येरमाळा  कळंब या दरम्यान मनाई करण्यात येत आहे.

बदल करण्यात आलेला जड वाहतुक मार्ग.

छत्रपती संभाजीनगर ते येरमाळा मार्गे बार्शी कडे जाणारी वाहतुक येरमाळा उड्डाण पुलावरुन येडशी मार्गे  बार्शी कडे पथक्रमण करतील.

बार्शी ते येरमाळा मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे येणारी वाहतुक बार्शी कुसळंब पांगरी येडशी येरमाळा उड्डाण पुलावरुन मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे पथक्रमण करतील.

3) कळंब ते येरमाळा मार्गे बार्शी कडे जाणारी वाहतुक कळंब मोहा फाटा (मनुष्यबळ पाटी) दहीफळ येडशी पांगरी कुसळंब मार्गे बार्शी कडे पथक्रमण करतील.

 बार्शी ते येरमाळा मार्गे कळंब कडे येणारी वाहतुक बार्शी कुसळंब पांगरी येडशी दहीफळ मोहा फाटा (मनुष्यबळ पाटी) मार्गे कळंब कडे पथक्रमण करतील.

 बार्शी ते येरमाळा मार्गे परळी, परभणी कडे येणारी वाहतुक बार्शी कुसळंब पांगरी येडशी ढोकी  कळंब मार्गे परळी परभणी कडे पथक्रमण करतील.

परभणी, परळी ते येरमाळा मार्गे बार्शी कडे जाणारी वाहतुक परभणी परळी कळंब ढोकी येडशी  पांगरी  कुसळंब मार्गे बार्शी कडे पथक्रमण करतील.

 कळंब ते येरमाळा मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जाणारी वाहतुक ही कळंब मनुष्यबळपाटी मांडवा  वाशीफाटा मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे पथक्रमण करतील. 8) छत्रपती संभाजीनगर, येरमाळा मार्गे कळंब कडे येणारी वाहतुक ही वाशीफाटा मांडवा मनुष्यबळपाटी मार्गे  कळंब कडे पथक्रमण करतील.

वरील बंधने ही पोलीस, रूग्ण सेवा, अग्निशमन दलाच्या वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहनांना, हलकी वाहने ( ) व एस. टी. बसेसला लागू राहणार नाही.

 
Top