धाराशिव (प्रतिनिधी)- दि. 15/04/2025 रोजी सायंकाळी 03:45 ते 04:00 वा चे दरम्यान उमरगा येथील बांधकाम गुत्तेदार गोंविद राम दंडगुले (वय 40 वर्षे) हे उमरगा शहरातील बॅक कॉलनी येथून राष्ट्रीय महामार्गावरून आपल्या दुचाकी/स्कुटी वरून घराकडे निघाले होते. ते स्टेट बॅक ऑफ इंडिया च्या ए.टी.एम. जवळ छ. शिवाजी कॉलेज समोर उमरगा येथे आले असता एका विना नंबरच्या इर्टिगा कार मधून आलेल्या तिन ते चार अज्ञात इसमांनी गोविंद दंडगुले यांची दुचाकी रस्त्यात अडवून धारदार शस्त्रांनी (कोयत्यांनी) गोविंद दंडगुले यांच्या डोक्यावर हातावर वार केले व नंबर प्लेट नसलेल्या सिल्हर कलरच्या इर्टिगा कार मधून सुसाट वेगाने पळून गेले जखमी श्री. गोविंद राम दंडगुले यांना नागरिकांनी तात्काळ खाजगी रुग्णालय येथे उपचार कामी दाखल केले. त्यानंतर त्यांना सोलापूरच्या खाजगी रूग्णालयात तातडीने हलविण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत.
सदर प्रकरणी पोनि अश्विनी भोसले यांनी तात्काळ सुत्रे हलवून आपली तपास पथके रवाना केली. पोलीस अधीक्षक संजय जाधव, बमा अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने गुन्हयात वापरलेल्या गाडीचा पाठलाग करून पोउपनि पुजरवाड, सपोफौ ओव्हाळ, पोहेकॉ कोनगुलवार, पोना कावळे, चालक पोहेकॉ कांबळे यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर खजुरी या गावाच्या अलिकडे इर्टिगा कार पकडली. परंतु आरोपी अंधाराचा फायदा घेवून गाडी सोडून पळाले. त्यानंतर पोनि अश्विनी भोसले, सपोनि कन्हेरे,पोउपनि पुजरवाड,पोना यासिन सय्यद, पोकॉ नवनाथ भोरे यांच्या पथकाने रात्रभर अविरत परिश्रम घेवून गुन्हेगारांचा माग काढला. त्यांना सदरील आरोपी बसवकल्याण कर्नाटकात भागात गेले असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने तात्काळ तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटना घडल्यापासून 24 तासांच्या आत कर्नाटक राज्यातील बसवकल्याण तालुक्यातील एका हॉटेलमधून दि. 16/04/2025 रोजी आरोपी नामे राहूल रमाकांत परशेट्टी रा. मुळज ह. मु. काळे प्लॉट उमरगा, शिवा कुक्कुरडे रा. कुन्हाळी व प्रदिप कलशेट्टी रा. जुनी पेठ उमरगा यांना चौकशी कामी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी करता समोर आलेली माहिती अशी की, राहुल रमाकांत परशेट्टी रा. मुळज ह.मु. काळे प्लॉट उमरगा याला सुमारे दोन वर्षा पुर्वी श्री. गोविंद दंडगुले यांनी मोकळी जागा (प्लॉट) 6 लाख रूपयांमध्ये घेवून देतो, आत्ता दिड लाख रूपये दे व उरलेले पैसे थोडे थोडे करून दे असे सांगितल्याने राहूल रमाकांत परशेट्टी याने दिड लाख रूपये जोडाजोड करून गोविंद दंडगुले यांना दिले. त्यानंतर वेळोवेळी प्लॉट दाखव, इसार पावती करून दे असे सांगुनही गोविंद दंडगुले यांनी दाद दिली नाही. आठ-दहा दिवसांपुर्वी पुन्हा मला मोकळी जागा (प्लॉट) दे, नाहीतर दिड लाख रूपये तरी परत दे असे राहूल परशेट्टी हा गोविंद दंडगुले यास म्हणाला असता गोविंद दंडगुले याने पैसे परत देण्यास नकार देवून, “जा पैसे पण देत नाही व प्लॉट पण देत नाही, तु का बाँड वर लिहून पैसे दिलेस काय ?“ असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली त्याचा राग मनात धरून राहूल परशेट्टी याने आपल्या मित्रांच्या मदतीने गोविंद दंडगुले याचेवर लक्ष ठेवून त्याला शिवाजी कॉलेज समोर दि. 15/04/2025 रोजी सायंकाळी 03:45 ते 04:00 वा. च्या सुमारास गाठले व त्यास धारदार शस्त्रांनी डोक्यावर, हातावर मारून गंभीर जखमी करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
सदर प्रकरणातील जखमी गोविंद राम दंडगुले यांचेचर यशोधरा हॉस्पीटल सोलापुर येथे उपचार चालु असल्याने व ते बेशुध्द असल्याने जखमीचे वडील, भाऊ, बहिण, मेहुणा, मामा व इतर नातेवाईक यांना घटना घडल्यापासुन वेळोवेळी घडेलल्या घटनेबाबत तक्रार देण्यासाठी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी व आम्ही स्वतः पोनि अश्विनी भोसले, इतर अधिकारी व बीट अंमलदार यांनी वेळोवेळी विनंती केली तसेच प्रतिष्ठीत व्यक्तींनी पण त्यांना तक्रार देण्यासाठी विनंती केली असताना देखील नातेवाईकांनी फिर्याद देण्यास नकार दिल्याने व टाळाटाळ केल्याने गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन व गुन्हा गंभीर असल्याने, तात्काळ दाखल करणे आवश्यक असल्याने बीट अंमलदार पोहेकॉ / 1286 अतुल जाधव यांनी सदर प्रकरणात सरकार तर्फे फिर्याद दिलेवरून पो.स्टे. उमरगा गु.र.नं. 234 / 2025 कलम 109, 126 (2), 3(5) भारतीय न्याय संहिता, सहकलम 4/25 शस्त्र अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला असुन गुन्हयाचा तपास सपोनि श्रीकांत भराटे हे करीत आहेत.
गुन्हयाचे तपासात निष्पन्न आरोपी नामे राहुल रमाकांत परशेट्टी रा. मुळज ता. उमरगा, शिवा कुकुर्डे रा. कुन्हाळी ता. उमरगा, प्रदिप कलशेट्टी रा. जुनीपेठ उमरगा ता. उमरगा व फरार आरोपी नवतेज तोरणे रा. काळेप्लॉट उमरगा ता. उमरगा यांनी यातील जखमीवर घातक शस्त्राने हल्ला केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी क्र. 01 ते 03 यांना सदर गुन्हयात अटक करून अटकेतील आरोपी राहुल परशेट्टी यांचेकडुन गुन्हयातील जखमीस मारहाण करण्यासाठी उपयोगात आणलेले 03 लोखंडी कोयते तसेच आरोपींनी गुन्हयात वापरलेली सिल्व्हर रंगाची इस्टीगा कार शासकीय पंचासमक्ष जप्त करण्यात आली असुन फरार आरोपी नवतेज तोरणे यास शोधण्याकरीता तपास पथक तयार करून पाठविण्यात आलेले आहे. लवकरच त्याला अटक करीत आहोत. सदरची धाडसी कामगिरी घटना घडल्यापासुन 16 तासाच्या आत पो.स्टे. उमरगा येथील अधिकारी व अंमलदार यांनी परराज्यात जावुन अविरत परिश्रम घेवुन, क्षणाचीही विश्रांती न घेता तातडीने पार पाडलेली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अश्विनी भोसले, सपोनि पांडुरंग कन्हेरे, पोउपनि गंगाधर पुजरवाड, सपोफी प्रदिप ओव्हळ, पोहेकॉ चैतन्य कोगुलवार, पोना यासिन सय्यद, पोना अनुरूद्ध कावळे, पोको नवनाथ भोरे यांच्या पथकाने केली आहे.
नागरिकांनी फरार आरोपी नवतेज तोरणे यांचे राहण्याचे ठिकाणाबाबत कांही माहिती मिळुन आल्यास तात्काळ पोलीसांना कळवावे. तसेच नागरिकांनी कुठल्याही प्रकारची भिती मनात न बाळगता कुठल्याही प्रकारची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा. उमरगा पोलीस आपल्या सेवेत सदैव तत्पर आहेत.