भूम (प्रतिनिधी)- भूम शहरातील जैन बांधवांच्या वतीने आज महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली.
भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त भूम येथील कसबा जैन मंदिर येथून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. बाजार रोड, गोलाई चोक, मेन रोड, नगरपालिका मार्गे ही मिरवणूक निघून कसबा जैन मंदिर येथे विसर्जित करण्यात आली. यावेळी पुरुष महिला व मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगवान महावीरांच्या उपदेशाप्रमाणे ही मिरवणूक अत्यंत साधी व शिस्त पूर्ण होती. या मिरवणुकीत अध्यक्ष सुनीलकुमार डुंगरवाल, शितल भाई शहा, अभयकुमार गांधी, विवेक पोकर्णा, स्वप्नील शहा, प्रदीपकुमार आहेरकर, डॉ. शांतीनाथ अंबुरे, बाहुबली एखंडे, राजकुमार आहेरकर, निलेश शहा, संतोष मुनोत, राजकुमार पितळे, नेमचंद मुनोत, नेमचंद पोकर्णा, विजयकुमार सुरपुरिया, महावीर भोपलकर, गणेश गुगळे, प्रीतम आहेरकर, डॉ. शुभम पोकर्णा, सूरज शहा, धवल गांधी, सुनील जोशी आदि जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणुकीनंतर आरती करण्यात आली.