धाराशिव (प्रतिनिधी)- 10 एप्रिल 2025 रोजी जिल्हा रुग्णालयातील आयुष कक्षामध्ये होमिओपॅथी दिवस साजरा करण्यात आला. होमिओपॅथी चे जनक डॉक्टर सॅम्युअल हनिमन यांच्या जयंतीनिमित्त होमिओपॅथी दिवस साजरा करण्यात येतो .

कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर यांनी सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीमध्ये होमिओपॅथी  दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे नमूद केले. तसेच असंसर्गजन्य आजाराच्या उपचारासाठी व उत्तम आरोग्यदायी भविष्यासाठी होमिओपॅथी उपचाराचा वापर करण्यास सांगितले. जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तानाजी लाकाळ यांनी होमिओपॅथीक उपचार थायरॉईड रुग्णासाठी वरदान असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पल्लवी कोथळकर यांनी केले. होमिओपॅथी वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा पवार व डॉ.सय्यद उजमा यांनी उपचार हे संधिवात, अस्थमा, पित्ताशयातील खडे, मुतखडा एलर्जी, त्वचारोग यामध्ये प्रभावी असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी जिल्हा आयुष कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर ऋतुजा जगदाळे, आयुर्वेद वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नौशीन खान, युनानी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अबरार अहेमद व डॉक्टर महेविश शेख तसेच भारत हिंगमीरे, फारुख काझी, मनीषा अंगरखे हे उपस्थित होते.

 
Top