धाराशिव (प्रतिनिधी)-  आज दिनांक 26 4 2025 रोजी वैराग्य महामेरू श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या समाधी सोहळा व पुण्यतिथी निमित्त कुंभार गल्ली धाराशिव या ठिकाणी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

 धाराशिव शहरामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भजन मूर्ती पूजन दिंडी व पालखी सोहळा आरोग्य तपासणी शिबिर आरती व गुलाल पुष्प उधळण सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सात वाजता नागनाथ अण्णा कुंभार, उपाध्यक्ष,अखिल भारतीय प्रजापती कुंभकार महासंघ, महादेव खटावकर, जिल्हाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र कुंभार समाज,व पांडुरंग कुंभार, युवा जिल्हाध्यक्ष,अखिल महाराष्ट्र कुंभार समाज,लिंबराज कुंभार,युवा उपाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र कुंभार समाज यांच्यातर्फे मूर्ती पूजन पालखी व दिंडी सोहळ्याचे उद्घाटन करून दिंडी सोहळा सुरुवात केली,दिंडीचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक पोस्ट ऑफिस काळा मारुती चौक नेहरू चौक व कुंभार गल्ली धाराशिव येथे दिंडीची सांगता करण्यात आली.

या ठिकाणी उपस्थित कृष्णा कुंभार अमृत कुंभार रामभाऊ कुंभार विष्णू कुंभार प्रसाद गोरे शंकर गोरे बालाजी कुंभार अभिषेक कुंभार शुभम कुंभार समर्थ कुंभार राजेश कुंभार सागर कुंभार पंकज कुंभार प्रशांत कुंभार नामदेव शिरसागर बाळू बाळासाहेब कुंभार बापू कुंभार सुनील कुंभार स्वप्निल कुंभार अंबादास कुंभार बळीराम कुंभार नाना कुंभार कृष्णा कुंभार श्रीकांत कुंभार अभिजीत कुंभार उपस्थित होते. त्यानंतर मोफत आरोग्य शिबिर याचे उद्घाटन माननीय श्री दिगंबर कुंभार नागनाथ कुंभार व भागवत कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले तसेच आरती श्री संत गोरोबाकाका यांची आरती व पुष्प गुलाल उधळण सोहळा माननीय श्री डॉक्टर रमेश जावळे एमडी मेडिसिन व दिगंबर बळीराम कुंभार पोलीस हेडकॉन्स्टेबल यांच्या हस्ते करण्यात आली आहे त्यानंतर महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले   यावेळी  भाविक महिला पुरुष बच्चे कंपनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top