तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्याची खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि.26 एप्रिल संपन्न झाली.
प्रारंभी महेश देवकाते तालुका कृषि अधिकारी यांनी कृषि विभागाने सन 2024-25 या वर्षातील राबविलेल्या सर्व योजनांची सविस्तर माहिती सांगितली. तसेच सन 2025-26 या वर्षाचे नियोजन, बीजप्रक्रिया, गाव बैठका, बीबीएफ पेरणी, टोकण यंत्र पेरणी, गोगलगाई निर्मूलन या विविध मोहिमांची माहिती सांगून त्याचे महत्त्व व त्यामुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे सांगितले.
यात आमदार पाटील यांनी गुगल मीट द्वारे जॉईन होऊन खरीप हंगामाचे नियोजन, बियाणे व खते वापर, उपलब्धता व नियोजन यांची सविस्तर माहिती घेतली. तसेच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना मधून फळबाग लागून लक्षांक प्रमाणे करण्याबाबतच्या सूचना दिल्या. तसेच कांदा प्रक्रिया व आंबा प्रक्रिया याच्यावर यावर्षी काम करावे, नियमित कार्यशाळा, गाव बैठका, शेतकऱ्यांना दिलेल्या भेटी याचे फोटो व विडिओ तयार करून त्याच्या यशोगाथा तयार कराव्यात. जिल्यातील व तुळजापूर तालुकामध्ये यापूर्वी हळद क्षेत्र जास्त होते. नंतरच्या काळात क्षेत्र कमी होत गेले. याची क्षेत्राची माहिती घेऊन हळद प्रक्रिया उद्योगवर काम करण्याबाबत सूचना दिल्या. दरवर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी सर्वच योजनांसाठी ठराविक मार्क पद्धत ठरवून दरवर्षी त्यांचे अभिनंदन, सत्कार करण्यात यावा असे सांगितले. खरीप हंगामच्या नियोजनच्या तयारीसाठी सर्वाना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी गटविकास अधिकारी तुळजापूर अमोल ताकभाते, कृषि अधिकारी पंचायत समिती पिंपरकर, विमा प्रतिनिधी, सर्व मंडळ कृषि अधिकारी कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक/ सेवक उपस्थित होते.