तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त श्री संत गोरोबा काका सेवा मंडळ तेर परीसर यांच्या वतीने आयोजित वारकरी संत सम्मेलन हभप संदिपान महाराज हसेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 24 एप्रिलला संपन्न झाले.

यावेळी गिरी महाराज एकूरगा, दत्ता महाराज तांदुळवाडीकर, स्वरूप महाराज तांबोटा, भारत महाराज शेळके, नवनाथ महाराज पायभाय,हरीदास महाराज पाटील, मनोहर महाराज आळंदीकर,निलेश महाराज जाधव, सुनिल महाराज बोराडे यांनी आपले विचार व्यक्त केले.यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.

 
Top