परंडा (प्रतिनिधी) - कृषी उत्पन्न बाजार समिती परंडा येथील आरोग्य तपासणी शिबीराचे उदघाटन शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट रणजित पाटील व भूम परंडा वाशीचे माजी आमदार राहुल मोटे यांचे बंधू बाणगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक ॲड. रणजित मोटे यांच्या हस्ते झाले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन, उपसभापती संजय पवार, संचालक डॉ. रविंद्र जगताप, ॲड.सुभाष वेताळ, सरपंच तथा मा.जिल्हा मजूर फेडरेशन संचालक धनंजय आबा हांडे, विधानसभा अध्यक्ष हनुमंत गायकवाड, तालुका उपाध्यक्ष बंडू रगडे, बुद्धीवान लटके, गणेश नेटके, डॉक्टर, स्टाफ व व्यापारी, हमाल, मापाडी आदी मोठया संख्येने उपस्थित होते.या शिबाराचे अनेक जणांनी आपल्या आरोग्याची तयासणी करून घेतले.