धाराशिव (प्रतिनिधी)- विले पार्ले - मुंबई येथील दिगंबर जैन मंदीर, मुंबई महानगर पालिकेतील आधिकाऱ्यांनी कुठलीही नोटीस न देता संगनमताने जमीनदोस्त केले. मध्य प्रदेशात काही समाजकंटकानी श्वेतांबरी जैन साधुंना मारहाण केली. तीन आर्यिका माताजींवर गाडी घालून गंभीर जखमी केले. तसेच महाराष्ट्रासह इतर राज्यातील जैन मंदीर,तिर्थक्षेत्र,सिद्ध्क्षेत्र यावर अतिक्रमण करणे,क्षेत्रा शेजारी मांसवीक्री करणे,दारुचे दुकाने उघडणे, हिंसक कृत्य करने, जे कृत्य जैन धर्मात वर्ज्य आहे. अशी कृत्य तेथे करणे. त्यामुळे जैन धर्मियांच्या भावना दुखावल्या जात आहेत. सकल जैन समाज धाराशिव तर्फे दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकारी धाराशिव यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.
मुळामध्ये जैन धर्मीय अहिंसक,शांतताप्रिय असुन यांच्या पासुन समाजाला,देशाला कुठलाही त्रास नाही.परंतू जैन धर्मीय अल्पसंख्यांक असुन त्यांना इतरांकडून विनाकारण त्रास होत आहे.तरी शासनाने याकडे लक्ष्य द्यावे व दोषी लोकांवर कडक कारवाई करावी ही विनंती करण्यात आली आहे.
सकल जैन समाजा तर्फे उल्हास चाकवते, अतुल अजमेरा, मनोज कोचेटा,अमित जगधने,मनोज चाकवते,रमेश फडकुले,अतुल कांबळे, सुहास हिंदाने, विजय मुथा, रोहन कोचेटा,अमित गांधी,मिलिंद गांधी,अमित अजमेरा, हेमंत पांडे, धिरज पांडे, प्रविण गडदे, कुणाल मेहता, शिरीष गांधी, प्रिता गांधी, प्रतिभा चाकवते, स्मिता चाकवते, माधवी शहा, अनेक बंधू व भगिनी हजर होत्या. जिल्हाधिकारी कार्यालया तर्फे तहसीलदार ज्योती चव्हाण यांनी निवेदन स्विकारले.