उमरगा (प्रतिनिधी)-  राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांचा आज दि.25 एप्रिल रोजी 61 वा वाढदिवस. परंतु 3 दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर मधील पेहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वाढदिवस साजरा केला नाही. परंतु याच दिवशी राज्य  परिवहन महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी उमरगा आगारासाठी नवीन 5 लालपरी बसेस उपलब्ध करून देऊन प्रवाश्यांच्या सोयीसाठी अनोखी भेट दिली आहे. याबद्दल माजी आमदार तथा शिवसेना उपनेते यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे त्यांची भेट घेऊन आभार मानले. 

उमरगा आगारातील चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात असुन ते पुर्ण झाले की लागलीच आणखी 25 इलेक्ट्रिक बस उपलब्ध होतील. तसेच उमरगा व मुरुम बसस्थानक नूतनीकरणाच्या निविदा प्रक्रिया लवकरच पुर्ण होत असून तीही कामे लवकरच सुरू करण्यात येतील. अशी ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिल्याची माहिती माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे.

 
Top