धाराशिव (प्रतिनिधी)-  थोर महापुरुषांच्या जयंती निमित्ताने, वर्गणीच्या नावाखाली जबरदस्तीने देणगीच्या नावावाली खंडणीच्या स्वरुपात अवाच्या सव्वा रक्कम मागणाऱ्या जयंती समितींचा व्यापाऱ्यांना त्रास होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती नसताना भरमसाठ पैसे मंडळाच्या माथी मारावे लागत असल्यामुळे अशा अधिकृत आणि अनधिकृत जयंती समित्यांच्या वर्गणी मागणीला चाप लावावा. अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

यावेळी कॅटचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संजय मंत्री, मराठवाडा उपाध्यक्ष संजय मोदानी, जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव, केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष धनाजी आनंदे, सराफ सुवर्णकार असोसिएशनचे कपील शर्मा, हॉटेल ॲन्ड बार असोसिएशनचे बापू सूर्यवंशी, जिल्हा सिड्स ॲन्ड फर्टिलायजर असोसिएशनचे संजय मोदानी,  जिल्हा मशिनरी असोसिएशनचे अविनाश काळे,  जिल्हा फर्निचर ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्सचे  अजहर खान, जिल्हा मुद्रक संघाचे महादेव मुळे, तालुका व्यापारी महासंघाचे नितीन फंड, उपाध्यक्ष विशाल थोरात, अमित मोदानी, संपतराव डोके, जिल्हा सचिव महेश वडगावकर, नितिन नायर, सुभाष शेट्टी, श्याम बजाज व इतर व्यापारी उपस्थित होते.

 
Top