भूम (प्रतिनिधी)- उन्हाळ्यात वाढते ऊन लक्षात घेऊन समस्त कोष्टी समाज बांधवानी एकत्र येऊन मेन रोड भूम वरील परगावाहून येणाऱ्या लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी पाणपोई सुरू केली आहे. यामुळे दररोज बाजार पेठेत येणाऱ्यांच्या थंडगार पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. पाणपोई सुरु करण्यासाठी चौंडेश्वरी ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठलराव बागडे यांनी पुढाकार घेतला. सर्व कोष्टी समाज बांधव आणि मेन रोड भूम वरील व्यापारी यांनी सहकार्य केले. यावेळी जेष्ठ समाज मार्गदर्शक कल्याणराव वरवडे, कपडा बँक भूमचे संदीप बागडे, कृष्णा दहिवाळ तसेच इतर समाज बांधव व्यापारी उपस्थित होते.