भूम (प्रतिनिधी)- तहसील कार्यालय भुम येथे भारतीय जैन संघटना व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार व नाला खोलीकरण व रुंदीकरण या योजनेची माहिती देण्यासाठी तालुक्यातील ग्रामसेवक व सरपंच यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी तहसीलदार जयंतराव पाटील, गटविकास अधिकारी मोहन राऊत साहेब, मृदसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रभाकर महामुनी, जैन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जयकुमार जैन, सचीव जयघोष जैन, राज्य समन्वयक अशोक पवार, व तालुका अध्यक्ष सुनीलकुमार डुंगरवाल उपस्थित होते.


 
Top