कळंब (प्रतिनिधी)- येथील पुनर्वसन सावरगाव मध्ये श्री जय हनुमान मंदिरामध्ये श्री जय हनुमान जन्मोत्सवानिमित्त ह.भ.प. बाल किर्तनकार आर्यन महाराज गोरड माऊली अनाथ आश्रम माळेगाव भोर पुणे यांचे शुक्रवार दि. 11 एप्रिल रोजी रात्री ठीक 9 ते 11 या वेळेत अमृततुल्य असे कीर्तन सेवा झाली. या हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंदिरामध्ये रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत हरी जागरणाचा कार्यक्रम कळंब, करंजकल्ला या गावचे भजनी मंडळीचा संपन्न झाला. तसेच शनिवार दि. 12 रोजी सकाळी 6 वाजुन 5 मिनिटांनी हनुमान जन्मोत्सव झालाव शोभेची दारू उडून आतिषबाजी करण्यात आली. सर्वं भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.