तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूरच्या सत्तेसाठी ड्रग्ज प्रकरणातुन कुरघोडीचे राजकारण सुरु असल्याची टीका कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विजय गंगणे यांनी पञकार परिषद घेवुन केली. 

तिर्थक्षेञ तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावर भाष्य करण्यासाठी शनिवार दि. 12 एप्रिल रोजी सांयकाळी पञकार परिषद घेतली.  यावेळी पञकारांशी संवाद साधताना गंगणे म्हणाले की, ड्रग्ज प्रकरणामुळे महाराष्ट्र भर या धार्मिक नगरीची बदनामी होतेय. ड्रग्ज प्रकरणी विरोधकांनी ड्रग्ज विक्रेत्याच्या आका बाबतीत कुठलाही आवाज उठवला नाही. माञ स्थानीक मंडळी विरोधात आरडाओरड करुन पुजा-यांची बदनामी केली. आमचे घराणे पुजा-यांचे आहे. आम्ही भाविकांची विधी करणे ते राहण्यापासुन भोजना पर्यतची सेवा करतो. याञा ही केली. याञेकरु जेवु घातले. आम्ही नशीबाने राजकारणात मोठे होत गेलो. पण ड्रग्ज प्रकरणाच्या माध्यमातून विरोधकांनी सत्ता मिळवण्यासाठी शहर बदनामीचे षढयंञ रचले. 

माझे बंधु विनोद गंगणेला मिञ परिवारात फिरत असताना व्यसन लागले. तात्काळ आम्ही त्यावर उपचार केले. नंतर विनोद गंगणेला पश्चात्ताप झाला आपण चुकलो पण इतर या व्यसनात अडकु नये म्हणून ड्रग्ज प्रकरण उघडकीस आणण्यास आम्ही प्रशासनाला सहकार्य केले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तिर्थक्षेञ तुळजापूर विकासासाठी हजारो कोटी आणले. यामुळे शहराचा विकास होवुन शहरात पर्यटन माध्यमातून पैसा येवुन बेरोजगारांना रोजगार मिळुन अर्थिक वृध्दी होणार आहे. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, धिरज पाटील, महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ही टीका केली. 

यावेळी सचिन रोचकरी, नरेश अमृतराव, आनंद कंदले, अमर हंगरगेकर, विजय कंदले, विशाल रोचकरी, संदीप गंगणे, किशोर साठे, औदुंबर कदम, इंद्रजित सांळुके, शांताराम पेंदे, धर्यशिल धरेकर, बाळासाहेब भोसले, रत्नदीप भोसले आदि उपस्थितीत होते.


 
Top