भूम (प्रतिनिधी)- भूम-परंडा मतदारसंघातील दोन्ही आगाराना नवीन बसेस देण्याची मागणी माजी आमदार राहुल मोटे यांनी परिवहन मंत्री यांच्याकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात राहुल मोटे यांनी म्हटले आहे की, राज्यात सध्या सर्व र्आगारात नवीन बसेस मोठ्या प्रमाणावर येत आहेत. परंतु या मतदारसंघातील भूम व परंडा आगारांना अद्यापही नवीन बसेस मिळालेला नाही. याबाबत मी स्वतः परिवहन मंत्री यांना भेटून 3 फेब्रुवारी निवेदन दिले आहे. तरीही आजपर्यंत बसेस न मिळाल्याने प्रवासी वर्गाला अनेक गैरसोईला तोंड द्यावा लागत आहे. तेव्हा आज पुन्हा परिवहन मंत्री व महामंडळाचे महा व्यवस्थापक यांना पत्र देऊन वरील दोन्ही आजारांना नवीन बसेस तात्काळ देण्यात यावेत. अशी मागणी केली आहे. सध्या हे हे काम विद्यमान आमदार यांनी करणे आवश्यक आहे. परंतु हे काम या माजी आमदार मोटे करीत असल्याने प्रवाशांतुन समाधान व्यक्त होत आहे.