धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकीच्या ई टी सी विभागातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा दि. 29 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता.हा मेळावा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आला.या मेळाव्यासाठी अनेक पालक,विद्यार्थी आणि विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचे पालक शशिकांत डोके, अलका मोरे, आणि कॉलेजचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने हे प्रमुख पाहुणे म्हणून तर ई टी सी विभाग प्रमुख डॉ.प्रशांत कोल्हे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन प्रा.नयना भोसले-वाघ, प्रा.वंदना मैंदर्गी आणि प्रा.वर्षा बोन्दर यांनी विभाग प्रमुख डॉ.कोल्हे यांच्या मार्गदर्शना खाली केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.बोन्दर यांनी तर प्रास्ताविक प्रा.नयना भोसले यांनी केले. गुगल मीट वर आयोजित या ऑनलाइन कार्यक्रमाला सर्व पालक आणि विद्यार्थ्यानी खूप छान प्रतिसाद दिला.अनुष्का मसलेकर हिच्या सुरेल सरस्वती स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी बोलताना विभाग प्रमुख डॉ.कोल्हे यांनी विभागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व कर्मचारी कटिबद्ध असल्याचे नमूद केले.त्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या सर्व उपक्रमांचा आढावा सादर केला. त्यात त्यांनी विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या सिस्को सेंटर विषयी  माहिती दिली सिस्को हि जगप्रसिद्ध आयटी आणि नेटवर्कींग कंपनी आहे , जी ईंटरनेट कनेक्टिव्हिटी साठी लागणारे ईलेक्ट्रॉनिक उपकरणे राऊटर , स्विच , मोडेम बनवते तसेच त्यांचे स्वताचे क्लाऊड स्टोरेज पण आहे . सिस्को मार्फत ट्रेनिंग घेतलेले विद्यार्थी ईन्फोसीस , टिसिस , असेंचर , एनटीटी डेटा , टाटा टेलिकॉम व ईतर नामांकीत कंपनी मध्ये कार्यरत आहेत .

या प्रसंगी उपस्थित पालकांची समयोचित भाषणे झाली.पालकांपैकी  बागल,जाधव,गुलभिले,सिंग या पालकांनी त्यांचे विचार मांडले. तेरणा ट्रस्ट तर्फे विद्यापीठात रँक येणाऱ्या विद्यार्थ्यांना कै. सौ. चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील शिष्यवृत्ती देण्यात येते. त्याबद्दल पालकांनी आमदार  राणाजगजितसिंह पाटील व मल्हार पाटील यांचे आभार मानले.

सर्वांनी विभागाच्या कामकाजाचे विषयी आणि त्यांच्या पाल्याच्या प्रगती बाबत समाधान व्यक्त करून काही सूचना पण केल्या. प्राचार्य डॉ.माने यांनी विभागातील सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत ई टी सी विभाग विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेल्या अनेक उपक्रमांचा आढावा घेतला.त्यांनी पालकांच्या विविध मागण्यांवर संमती दर्शवत त्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमासाठी विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा.मैंदर्गी यांनी आभार प्रदर्शन केले.


 
Top