भूम (प्रतिनिधी)- श्रीरामचंद्र भगवान की जय या जयघोषत कसबा येथील पुरातन श्रीराम मंदीरात जन्म उत्सव सोहळा पुष्पवृष्टी करत साजरा करण्यात आला.

दि 6 रोजी सकाळी सहा ते आठ या कालावधीत श्रीराम सीता व लक्ष्मण यांच्या मुर्तीस पवमान अभिषेक करण्यात आला यानंतर सकाळी 1 10 ते 12 या वेळेत नारदिय किर्तनकार अमित जोशी यांचे किर्तन संपन्न झाले . यानंतर श्रीरामास न्हाउ घालुन पाळण्यात ठेवुन पाळना म्हणण्यात आला यानंतर महाअरती होवुन प्रसाद वाटप करण्यात आला संध्याकाळी आठ वाजता श्रीरामाची पालखीतून मिरवणुक काढण्यात येणार आहे राम जन्म उत्सव निमित्त भाविकांची मोठी गर्दी दिसून आली गुढी पाडवा ते हनुमान जयंती या पंधरा दिवसाच्या कालावधीत या उत्सवाचे आयोजन केले जाते याकाळत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. यावेळी मंदिरात महिला सह भाव विभागतांची श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली. या श्रीराम जन्मोत्सवाला माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, संयोगिता ताई गाढवे, सुधीर देशमुख, श्रीराम मुळे, प्रशांत बुरटे, दंतन देशमुख, बाळू राजउपाध्ये, श्रीराम कुलकर्णी, अनिल बुरटे, आबादास देशपांडे, अरुण देशमुख, रतन आरगडे यांच्यासह राम सेवेकरी उपस्थित होते.

 
Top