धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये विदयार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीबाबत शालेय प्रशासन व विदयार्थी वाहतुक संघटनेच्या पदाधिकाऱ्यासोबत आढावा बैठक  मुख्याध्यापक कक्षात घेण्यात आली .

या बैठकीसाठी प्राचार्य नंदकुमार नन्नवरे , विदयार्थी वाहतुक चालकमालक संघटनेचे पदाधिकारी दादा गवळी व इतर त्यांचे सहकारी तसेच प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख , उपमुख्याध्यापक प्रमोद कदम , पर्यवेक्षक सुनील कोरडे , डॉ. विनोद आंबेवाडीकर , शुभम मुंडे उपस्थित होते .

सदर बैठकीत सन 2025 -26 या शैक्षणिक वर्षात शासन निर्णयानुसार विदयार्थांची सुरक्षित वाहतुक कशी करावी , याबाबतच्या नियमांबाबत वाहतुक संघटनेच्या पदाधिक ऱ्यांना उपमुख्याध्यापक प्रमोद कदम यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तर प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी गतवर्षी संघटनेने केलेल्या कार्याबद्दल गौरवउद्गार काढले . प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख यांनी आपल्या सहकार्यातून पालक - विदयार्थ्यांना सुरक्षित वाहतुकीची हमी आम्ही देऊ शकलो याबद्दल सर्वांचे  आभार मानले.

 
Top