धाराशिव (प्रतिनिधी)- दिनांक 21 एप्रिल रोजी श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात जेईई मुख्य परीक्षेतील  अँडव्हान्स साठी पात्र झालेल्या यशवंत व गुणवंत विदयार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा सत्कार संस्थाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. गुणवंतामध्ये कुमारी विनिता दत्तात्रय कुलकर्णी हीस सरासरी 99.51 टक्के, कुमारी सोनिया महेश माळी हीस सरासरी 89.15 टक्के, कु. शुभम तानाजी कांबळे यास सरासरी 65.65 टक्के गुण मिळाले आहेत.

या सत्कार प्रसंगी बोलताना संस्थाध्यक्ष  सुधीर  पाटील म्हणाले की धाराशिव जिल्हयातील गुणवंत विदयार्थी 10 वी नंतर लातूर, संभाजीनगर, हैद्राबाद, कोटा अशा ठिकाणी जेईई व एनईईटी (नीट) च्या तयारीसाठी जातात. यामुळे पालकांना आर्थिक नुकसान होते. पालकांचे आर्थिक नुकसान होऊ नये त्याच बरोबर विदयार्थ्यांना घरच्या वातावरणात तयारीसाठी जास्तीचा वेळ मिळावा, त्यांना योग्य अशा तज्ञ प्राध्यापकांकडून माफक फीसमध्ये मार्गदर्शन मिळावे हे उद्दिष्ट समोर ठेवून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने जेईई, एनईईटी (नीट) परीक्षेसाठी श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालय येथे धाराशिव पॅटर्न तयार करण्यासाठी अजून एक सुवर्ण संधी 'फिजिक्सवाला' (पीडब्ल्यू) मार्फत एक भारतातील नामवंत क्लासेस कडून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यासाठी पीडब्ल्यूच्या वर्गखोल्या ह्या अद्यावत करण्यात आलेले आहेत. यामध्ये डिजिटल बोर्ड सुविधा, सर्व कॉलेज परिसर सीसीटीव्ही कक्षेत, ए.सी. वर्गखोल्या, लेक्चर रेकॉर्डिंग साठी कॅमेरे, पीडब्ल्यूचे ॲप, पीडब्ल्यू कीट, अद्यावत स्टडी मटेरियल, सुसज्य ग्रंथालय व अभ्यासिका, डेली डाऊट सॉल्विंग सत्र अशा वेगवेगळ्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत. पीडब्ल्यू क्लासेसची सुविधा इयत्ता 8 वी ते 12 वी साठी उपलब्ध आहेत. आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आत्तापासूनच पीडब्ल्यूचे वर्ग करण्याचे आवाहन संस्थाध्यक्ष  सुधीर  पाटील यांनी केले.

या सत्कार समारंभासाठी संस्थाध्यक्ष  सुधीर  पाटील, संस्थेचे सीईओ  आदित्य पाटील , प्रशासकीय अधिकारी एस. एस. देशमु ,  संस्था संचालक संतोष कुलकर्णी प्राचार्य  एन. आर. नन्नवरे, उपप्राचार्य  एस. के. घार्गे, उपमुख्याध्यापक  प्रमोद कदम , पर्यवेक्षक  एम. व्ही. शिंदे  आदींची उपस्थिती होती. तसेच कॉलेजमधील  ए. व्ही. भगत,  एन. के. मोमीन, एम. एन. शिंदे, एस. एस. सदाफुले, जे. एस. पाटील, आर. जी. लोमटे, एस. एल. तेली, के. बी. मोहिते, मिश्रा, आदींची देखील उपस्थिती होती.


 
Top