धाराशिव (प्रतिनिधी-  भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड अभ्यास करून आपली गुणवत्ता सिद्ध केली. केवळ दिनदलितांसाठीच नव्हे तर देशासाठी ही त्यांनी खूप कार्य केले. एकेकाळी बहिष्कृत केलेल्या माणसांना त्यांनी प्रवाहात आणले. त्यामुळेच आज दिन दलितांचा विकास होत आला आहे व होत आहे. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श घेऊन प्रचंड वाचन करून अभ्यास करावा, मेहनत घ्यावी व गुणवत्तेबरोबरच वक्तृत्ववान बनावे. असे प्रतिपादन प्रा. राजा जगताप यांनी केले. 

धारूर येथे  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त दि.14 एप्रिल रोजी आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटना प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना प्रा.राजा जगताप यांनी केले आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच बालाजी श्रीपती पवार हे होते. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पुजन प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला तानाजी गायकवाड अनु,जाती जमाती आयोग सदस्य, पोलीस पाटील सुनिल शिंदे, माजी सरपंच गणेश जगताप, विश्वनाथ रोकडे,सोसायटी चेअरमन रामहारी गायकवाड,ग्राम पं.सदस्य तुकाराम गायकवाड,अश्वीनी गायकवाड,माजी ग्रा.सदस्य कांचन गायकवाड, दत्ता पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष हिराचंद गायकवाड आदी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये गावातील सर्व जाती धर्माचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सूञसंचालन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बापुराव गायकवाड यांनी केले. आभार तानाजी गायकवाड यांनी मानले.

 
Top