भूम (प्रतिनिधी )- भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन व प्रभू श्रीराम नवमीचा उत्सव तालुका कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा केला . मतदार संघात सर्वाधिक पक्ष सदस्य नोंदणी झाल्याबद्दल वरिष्ठांनी तालुका पदाधिकाऱ्यांचे विशेष कौतुक केले .
रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी तालुका भाजप कार्यालयात पक्ष धोरणानुसार दीड कोटी पक्ष सदस्य नोंदणी झाल्याचा आनंद, प्रभू श्रीराम नवमी व पक्ष स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.यावेळी पक्ष पदाधिकाऱ्यांनी अनेक भावना पक्षाचे वरिष्ठ मकरंद पाटील यांच्याकडे बोलून दाखवल्या आहेत
यावेळी परांडा विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर , जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील, तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, ता.सरचिटणीस संतोष सुपेकर, महिला जिल्हा उपाध्यक्ष लताताई गोरे, ता.उपाध्यक्ष हेमंत देशमुख , अ.जा.मोर्चा ता.अध्यक्ष प्रदीप साठे , अल्पसंख्याक ता. अध्यक्ष अब्दुल लहाजी, ता.प्रसिद्धीप्रमुख शंकर खामकर, ता. उद्योग आघाडी अध्यक्ष चंद्रकांत गवळी, ता.विधिज्ञ अध्यक्ष संजय शाळू , शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर , समाधान अंधारे, रोहीदास भोसले, ज्ञानेश्वर सानप, अकाश शेटे , शुभम खामकर, सिद्धार्थ जाधव, सुहास सानप , शांतीराज बोराडे , आदि पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्य उपस्थित होते ..