वाशी (प्रतिनिधी)- वाशी व तालुक्यात विविध ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. वाशी येथील भीमनगर येथे जयंतीचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. वाशी शहरासह तालुक्यामधे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वाशी  येथील सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालय, खाजगी बँका, सामाजिक संघटना अशा विविध ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेची स्थापना करुन, पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

वाशी शहराचा जयंतीचा मुख्य कार्यक्रम येथील भीमनगर येथे घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी वाशी तहसीलच्या पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार विद्या राठोड, वाशीच्या नगराध्यक्षा विजयाबाई गायकवाड, ठाकरे शिवसेनेचे नेते प्रशांत चेडे, माजी नगराध्यक्ष निचीत चेडे, नागनाथ नाईकवाडी, नगरसेवक श्रीकृष्ण कवडे, स्मिता गायकवाड, शिवहार स्वामी, भागवत कवडे, कृष्णा गवारे,शिंदे शिवसेना वाशी शहर प्रमुख सतीश शेरकर, वाशी येथील सुहास कवडे, संभाजी भांडवले, शिवशंकर चौधरी, सिद्धेश्वर भालेकर,नानासाहेब उंदरे, दत्तात्रय कवडे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी प्रशांत चेडे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर उपस्थित सर्वांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले. वाशी नायब तहसीलदार विद्या राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. वाशी शहरातील अनेक इतर मान्यवर, नागरिक, भीम नगरमधील बांधव यांनीही बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. जयंतीनिमित्त वाशी शहरातून बाबासाहेबांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

 
Top