धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 वी जयंतीनिमित्त सोमवारी (दि. 14) राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या वतीने संघर्षातून पाल्यांना उच्चशिक्षीत करणाऱ्या धाराशिव शहरातील 21 कुटूंबकर्त्यांच्या त्यांच्या घरी जावून शाल, श्रीफळ फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
परिवारात डॉक्टर, इंजिनिअर, यशवंत, गुणवंत ठरलेल्या परिवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी सत्कार केला. यामध्ये भिमराव कांबळे, पंडीत कांबळे, सुदीश बनसोडे, सुरेश मदने, नागसेन शिंदे, पांडूरंग ननवरे, बबन सुर्यवंशी, शिवाजी गायकवाड, रत्नकांत माळाळे, उमाकांत माळाळे, करण वाघमारे, राजकुमार वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आशिष लगाडे यांनी केले. तर बालाजी डोंगे, इकबाल पटेल, अनिल जाधव, नामदेव चव्हाण आदींनी कार्यक्रमासाठी मदत केली.