तेर (प्रतिनिधी)-  धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त मुख्य काल्याचा कार्यक्रमानंतर दिंडया आपापल्या गावी मार्गस्थ झाल्या. काल्याच्या निमित्ताने श्री संत गोरोबा काका व श्री नृसिंह य़ांची यावेळी आनंददायी भेट पहाण्यासाठी शेकडो भाविक भक्त यांनी गर्दी केली होती.

धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांचा वार्षिक यात्रा महोत्सव मंदिर परिसरात भरतो. दशमी पासून श्री संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम होत असतात. परंतू चैत्र अमावास्याला मुख्य काल्याचा कार्यक्रम हा तेर येथील पुरातन श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर येथे प्रतिवर्षी परंपरागत धार्मिक पद्धतीने भव्यदिव्य संपन्न झाला. मुख्य काल्याचा कार्यक्रम हा श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर येथे प्रतिवर्षी होत असल्याने याठिकाणी श्री संत गोरोबा काका यांची पालखी आली .तसेच अनेक ठिकाणच्या दिंडयाही याठिकाणी कार्यक्रमासाठी सहभागी झाल्या. प्रत्येक दिंडीतील फडकरी यांना येथे किर्तन करण्याची संधी दिली जाते. उपस्थित हभप भाऊसाहेब महाराज गोसावी, हभप शंकर महाराज थोबडे, हभप ज्ञानेश्वर महाराज रत्नपारखी यांच्या किर्तनानंतर मुख्य काल्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रचंड मोठया संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. मुख्य काल्याचा कार्यक्रम असल्याने श्री नृसिंह यांना उटी लाऊन अलंकार घालण्यात आले. मुख्य काल्याच्या कार्यक्रमामुळे श्री संत गोरोबा काका व श्री नृसिंह यांची यानिमित्ताने भेट होते.हा आनंदी सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.काल्याच्या कार्यक्रमानंतर दिंडया आपापल्या गावी मार्गस्थ झाल्या.

 
Top