तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सचिन काळे तर उपाध्यक्षपदी संतोष क्षिरसागर यांची निवड करण्यात आली आहे. येथील राम मंदिरात झालेल्या बैठकीमध्ये 11 एप्रिल रोजी होणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सचिन काळे तर उपाध्यक्षपदी संतोष क्षिरसागर, सचिव दीपक क्षिरसागर, मिरवणूक प्रमुख म्हणून बालाजी गोडसे,हरि क्षीरसागर यांची निवड करण्यात आली. यावेळी ग्रा.पं.सदस्य पवन वाघमारे,ॲड. सागर क्षिरसागर, दयानंद वाघमारे, प्रशांत गरड,सागर वाघमारे, नितीन फुलसुंदर,प्रसाद मोरे, हरी वाघमारे, शिवाजी क्षिरसागर, शशिकांत सुरवसे, नाना बनसोडे, प्रमोद काशीद, रणजीत सुरवसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.