तुळजापूर (प्रतिनिधी)- मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प प्रकल्प अंमलबजावणी कक्ष - पणन संचालनालय, पुणे
बाजार समित्यांची सन 2023-24 या वर्षाची वार्षिक क्रमवारी जाहीर झाली असुन यातराज्यस्तरीय स्मार्ट प्रकल्प अंतर्गत बाजार समिती गुणानुक्रमात राज्यातील 305 कृषीउत्पन्नबाजार समित्यात राज्यात तुळजापूर कृषीउत्पन्नबाजारसमिती 19 वा लातुर विभागात तिसरी व धाराशिव जिल्ह्यात पहिली आली , लातुर विभागातील 48समित्यांना मध्ये तुळजापूर कृषीउत्पन्नबाजारसमिती लातुर विभागात तिसरी आली आहे.
सदरील राज्यस्तरीय गुणानुक्रम देताना पायाभूत सेवा सुविधा व इतर सुविधा, आर्थिक व वैधानिक कामकाज व इतर निकष काढुन गुण देवुन मग राज्यस्तरीय गुणानुक्रम काढला जातो. लातुर विभागा अंतर्गत धाराशिव जिल्हयातील तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ला 140 गुण मिळुन राज्यात 19 व्या स्थानी उमरगा 51, मुरुम 57 , कळंब 58 स्थानी, धाराशिव 96 व्या स्थानी, वाशी व्109 या स्थानी, परांडा 117 व्या, लोहारा 163 व्या स्थानी आल्या आहेत.
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ सोलापूर, लातुर, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती असुन ही राज्यात 19 व्या स्थानी आले आहे. तुळजापूर तालुक्यातील कांदा बंगलोर, हैद्राबाद, सोलापूरला जातो. कांदा बाजार येथे सुरु झाला तर कांदा उत्पादकांना ञास, खर्च वाचेल व कृषी उत्पन्न बाजार समिती उत्पन्नीत भरीव वाढ होईल. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अँड. अशिष सोनटक्के, उपसभापती सचिन उमेश भोपळे पाटील, लेखापाल शिवानंद राठोड सह त्यांच्या सहकार्या माध्यमातून तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती वर्षानुवर्षे राज्यात चांगले यश संपादन करीत आहे. सभापती विजय गंगणे काळात प्रथम, सभापति सचिन पाटील असताना द्वितीय तर पुनश्च 2023-24ला सभापती अँड. अशिष सोनटक्के यांच्या मार्गादर्शना खाली प्रथम स्थानी आली.
सर्वाच्या सहकार्यान मुळे नंबर प्रथम - सभापती अशिष सोनटक्के
आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी सभापती उपसभापती, सर्व संचालक मंडख, आडती व शेतकरी यांच्या पाठबळ मुळे हे यश मिळाले आहे. यापुढे ही चांगले काम करुन शेतकऱ्यांच्या मालास योग्य बाजारभाव देण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याची प्रतिक्रिया कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अँड अशिष सोनटक्के यांनी दिली.