तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेचे चैत्री पोर्णिमा  सोहळा शनिवारी दि. 12 एप्रिल रोजी भक्तीभावाने संपन्न झाला. दिवसभरात उन्हाताहाची पर्वा न करता भाविकांनी तुळजापूरला येवून श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. चैञीपोर्णिमा दिनी शनिवारी पहाटे एक वाजता चरण होवुन धर्मदर्शन प्रारंभ झाला. देविजीस सकाळी सहा वाजता प्रथम भक्तांचे दहीदुध पंचामृत अभिषेक पुजा करण्यात आल्या. त्या संपल्यानंतर दहा वाजता देविजीस वस्ञोलंकार घालुन नित्योपचार पुजा केली. आज भाविकांनी श्रीतुळजाभवानी मातेस साडीचोळी, दहीदुध, पंचामृत, अभिषेक पुजा, भोगी, गोंधळ, दंडवत, पुरणावरणाचा नैवध, माळ परडी घेणे अदि विधी मनोभावे केले. आज सर्वच दर्शन रांगा भाविकांनी भरभरुन गेल्या होत्या. सांयकाळी देविजीस दहीदुध पंचामृत अभिषेक पुजा संपल्यानंतर देविजीस वस्ञोलंकार घातल्या नंतर नित्योपचार पुजा झाल्यानंतर मंदीर प्रांगणात छबिना आला. नंतर मंदीर प्रांगणात महंताचा जोगव्याने चैत्री पोर्णिमा दिनाचा धार्मिक विधीचा सांगता झाला.


आंबा, फुलांचा आकर्षक आरास !

चैञीपोर्णिमा औचीत्य साधुन श्रीतुळजाभवानी गर्भगृहात चांदी सिंहासनावर प्रथम आलेला आंबा व आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. आज तुळजाई नगरी आई राजा उदो..उदो..सदानंदीचा उदो..उदोच्या गजराने, हलग्याच्या कडकडाटाने दुमदुमून गेला होता. चैत्री पोर्णिमा निमित्त आज सर्वञ भक्तीमय वातावरण निर्माण झाल्याने लक्ष लक्ष नयनांनी चैत्री पोर्णिमा  सोहळा भाविकांचा मनात टिपला गेला. दहाकता लक्षात घेता. दर्शन रांगेत कुलर, थंड

पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले. भवानी तिर्थकुंडात भाविकांनी स्नान करुन दर्शन घेतले.


 
Top